जत तालुक्याची इत्यंभूत माहिती

काय आहे जत ? कोठे आहे जत भाग ? महाराष्ट्रात असूनही कानडी लोक का आढळतात इथे ? पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मागासलेपणाचे दु:ख का आलेय जतच्या नशिबी ? पावसाचे प्रमाण किती आणि कसे आहे ? इथे पडणारया पावसाच्या पाण्याचा थेंब कोठे जातोय ? पाणी नाही हे इतकेच कारण आहे ? का आणखी काही ? काय करतेय महाराष्ट्र शासन ? जत तालुक्याची इत्यंभूत माहिती पहा फक्त http://jalyuktjat.blogspot.in/ या ब्लॉग वर

Thursday, 23 May 2013

लोकसहभागातून दुष्काळ हटेल - डॉ. प्रशांत नारनवरे

लोकसहभागातून दुष्काळ हटेल - डॉ. प्रशांत नारनवरे

सांगली : काळाच्या ओघात काही नद्या नैसर्गिकरित्या लुप्त झाल्या. मात्र काही अभ्यासू लोकांनी दुष्काळी भागातील जलस्त्रोतांची वाढ होण्यासाठी तसेच भविष्यात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची योग्य साठवणूक केल्यास निश्चितच अशा परिस्थितीवर मात करता येते. त्या अनुषंगानेच जिल्ह्यातील अग्रणी नदी पुनरुज्जीवित करणे ही काळाची गरज असून त्यासाठी सर्वांनी एकत्र आल्यास लोकसहभागातून दुष्काळ हटेल, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.

हिंगणगाव ता. कवठेमहांकाळ येथे अग्रणी पुनरुज्जीवित करण्याच्या कामाचा प्रारंभ सभापती सौ. कोळेकर, जिल्हा परिषद सदस्य गजानन कोठावळे यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी डॉ. नारनवरे बोलत होते.

गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी नदीपात्रातील कचरा, टाकाऊ पदार्थ, वाढलेली झुडपे, नदीपात्राबाहेर काढणे आदी कामे जेसीबीच्या साहाय्याने केली जात असून आर्थिक बाजू लोकसहभागातून उचलली जात असल्याचे सांगितले. ग्रामपंचायती, सहकारी संस्था व शेतकऱ्यांकडूनही सहकार्य मिळणेबाबतची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अग्रणी पात्रातील वाळू उपसा करण्यासाठी अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याबाबतचे डिजिटल बोर्ड अग्रणी काठावरील नऊ गावांत लावण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला.

याप्रसंगी सरपंच गीतांजली माळी, बाळासाहेब पाटील, चंद्रशेखर सगरे, देवानंद लोंढे, प्रभाकर संकपाळ, सुनिल माळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान महाकाली कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे यांनी अग्रणी नदीस भेट दिली. तेथील कामाची माहिती घेऊन कारखान्यातर्फे मदत करण्याचे मान्य केले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










No comments:

Post a Comment