लोकमित्र अभियानातून गावच्या समस्यांचे निराकरण करणार - देवेंद्रसिंह
सांगली : लोकमित्र अभियानातून प्रत्येक गावातील समस्यांचे जागेवरच निराकरण करुन लोकांना न्याय देऊ, असे प्रतिपादन परिविक्षाधीन जिल्हाधिकारी देवेंद्रसिंह यांनी केले.
लकडेवाडी ता. जत येथे लोकमित्र अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तहसिलदार आप्पासाहेब समिंदर होते.
श्री. देवेंद्रसिंह म्हणाले, जत तालुका सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा
तालुका आहे. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी लोकमित्र अभियानाच्या
माध्यमातून तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या गावांमध्ये शासनाच्या
सर्व योजना राबविल्या पाहिजेत, विविध योजनांची माहिती मिळाली पाहिजे यासाठी
हे अभियान सुरु केले आहे, त्याचा फायदा ग्रामस्थांनी घ्यावा.
तहसिलदार श्री. समिंदर म्हणाले, जत तालुक्यातील ग्रामीण भागातील लहानशा खेड्यात हे अभियान राबविणार आहोत. त्यामध्ये रेशनकार्ड, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, पिण्याचे पाणी, चारा छावणी, तसेच जत पंचायत समितीकडील विविध योजना तळागाळापर्यंत पोहचविणार आहोत.
यावेळी गावातील गावकऱ्यांनी भारत निर्माण योजना सुरळीत सुरु करा, शेततलावाला मंजूरी द्या, आधारकार्ड द्या, वीज कनेक्शन मिळाले पाहिजे आदी मागण्या मांडल्या.
यावेळी उपअभियंता एन.बी.आडसूळ, विस्तार अधिकारी विष्णू गेजगे, मल्लेशा मेढीदार, ग्रामसेवक व्ही.बी.वाघमोडे, तलाठी अशोक हांगे, अरुण कोळी, मंडळ कृषी अधिकारी एम.एस.कायपुरे, सरपंच एकनाथ बंडगर, उपसरपंच भाऊसाहेब कटरे आदी उपस्थित होते.
सांगली : लोकमित्र अभियानातून प्रत्येक गावातील समस्यांचे जागेवरच निराकरण करुन लोकांना न्याय देऊ, असे प्रतिपादन परिविक्षाधीन जिल्हाधिकारी देवेंद्रसिंह यांनी केले.
लकडेवाडी ता. जत येथे लोकमित्र अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तहसिलदार आप्पासाहेब समिंदर होते.
तहसिलदार श्री. समिंदर म्हणाले, जत तालुक्यातील ग्रामीण भागातील लहानशा खेड्यात हे अभियान राबविणार आहोत. त्यामध्ये रेशनकार्ड, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, पिण्याचे पाणी, चारा छावणी, तसेच जत पंचायत समितीकडील विविध योजना तळागाळापर्यंत पोहचविणार आहोत.
यावेळी गावातील गावकऱ्यांनी भारत निर्माण योजना सुरळीत सुरु करा, शेततलावाला मंजूरी द्या, आधारकार्ड द्या, वीज कनेक्शन मिळाले पाहिजे आदी मागण्या मांडल्या.
यावेळी उपअभियंता एन.बी.आडसूळ, विस्तार अधिकारी विष्णू गेजगे, मल्लेशा मेढीदार, ग्रामसेवक व्ही.बी.वाघमोडे, तलाठी अशोक हांगे, अरुण कोळी, मंडळ कृषी अधिकारी एम.एस.कायपुरे, सरपंच एकनाथ बंडगर, उपसरपंच भाऊसाहेब कटरे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment