जलयुक्त गाव अभियान मोहीम राबविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह
सांगली : जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील टँकरग्रस्त गावात जलयुक्त गाव अभियान मोहीम राबविण्यासाठी सहकारी व स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात टंचाई परिस्थितीवर विविध उपाययोजना करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत श्री. कुशवाह बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, उपजिल्हाधिकारी सूचिता भिकाणे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. एस.एन. जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे उपस्थित होते.
जलयुक्त गाव अभियान राबविण्याची जबाबदारी संबंधित प्रांत अधिकाऱ्यांवर देण्यात येणार असून दुष्काळी परिस्थितीमध्ये ही योजना राबविण्यास प्राधान्य देण्यात आले आहे, असे श्री. कुशवाह यांनी सांगून पाणी पुनर्भरण करण्याचा कार्यक्रम गावोगावी राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
टँकरग्रस्त गावातील सिमेंट बंधारे, नालाबंडिंग, पाझर तलाव, गाव तलाव, लघु पाटबंधारे तलावामधील साचलेला गाळ काढण्याच्या कामासही जलयुक्त गाव अभियान काळात प्राधान्य देण्यात येणार आहे, असे श्री. कुशवाह यांनी सांगून या कामामध्ये जिल्ह्यातील स्वयंसेवी, सहकारी संस्था व युवा पिढीने मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन शासनाच्या योजनेस सहकार्य करावे, असे आवाहन केले.

No comments:
Post a Comment