जत तालुक्याची इत्यंभूत माहिती

काय आहे जत ? कोठे आहे जत भाग ? महाराष्ट्रात असूनही कानडी लोक का आढळतात इथे ? पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मागासलेपणाचे दु:ख का आलेय जतच्या नशिबी ? पावसाचे प्रमाण किती आणि कसे आहे ? इथे पडणारया पावसाच्या पाण्याचा थेंब कोठे जातोय ? पाणी नाही हे इतकेच कारण आहे ? का आणखी काही ? काय करतेय महाराष्ट्र शासन ? जत तालुक्याची इत्यंभूत माहिती पहा फक्त http://jalyuktjat.blogspot.in/ या ब्लॉग वर

Thursday 23 May 2013

दुष्काळ कायमचा मिटवण्यासाठी जास्त बंधारे बांधावेत : सुरेश आंबुलगेकर


दुष्काळ कायमचा मिटवण्यासाठी जास्तीत जास्त बंधारे बांधावेत - सुरेश आंबुलगेकर
 
सांगली : जतचा दुष्काळ कायमचा मिटवायचा असेल तर जास्तीत जास्त बंधारे झाले पाहिजेत, असे मत कृषी संचालक सुरेश आंबुलगेकर यांनी व्यक्त केले.

कृषी संचालक सुरेश आंबुलगेकर यांनी जत तालुक्याचा दौरा करून कृषी  विभागामार्फत सुरू असणाऱ्या सिमेंट बंधाऱ्याच्या कामांची पाहणी केली. या कामांची पाहणी केल्यानंतर झालेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

श्री. आंबुलगेकर सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी जत तालुक्यातील दरिकोनूर येथील बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी  त्यांच्यासोबत सह संचालक डॉ. शिसोदे, दिलीप झेंडे, जयवंत कवडे, एम.एम. खताळ, सुरेंद्र पाटील,  बी.टी. नागणे, श्रीकांत पाटील, विलास बहादुरे, ए.ए. भोसले आदी उपस्थित होते.

दरिकोनूर येथे दऱ्याप्पा मंदिराच्या पायथ्याला बांधलेल्या बंधाऱ्याचे  काम अतिशय चांगले झाले आहे. येथे 24 हजार घनमीटर पाणीसाठा होणार आहे. अशा प्रकारचे बंधारे  झाल्यास जतचा दुष्काळ कायमचा संपेल. यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुष्काळावर अखेरची मात म्हणून कामे  करावीत, अशी सूचना त्यांनी केली. यावेळी त्यांनी  बंधाऱ्याचे खोलीकरण होणे  गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. बंधाऱ्याच्या वरच्या व  खालच्या बाजूला पाणी साठा होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास भविष्यात तालुक्यातील पाणीपातळी वाढून दुष्काळाची तीव्रता कमी करता येऊ शकते.

जतमध्ये आज रोजी 18 कोटींची कामे सुरू आहेत. ही कामे चांगल्या दर्जाची आहेत. यापुढे जाऊन अधिकाऱ्यांनी उर्वरित कामेही हाती घ्यावीत, असेही ते म्हणाले. दरिकोनूरचे  सरपंच  सदाशिव व्हनमाने म्हणाले, या बंधाऱ्यामुळे येथील 100 कुटुंबांना लाभ होणार आहे. या भागात पाऊस पडल्यानंतर पुढच्या वर्षीचे चित्र वेगळे असेल. यावेळी विश्वास भोसले, अमिन शेख व गावकरीही उपस्थित होते.
 

No comments:

Post a Comment