जत तालुक्याची इत्यंभूत माहिती

काय आहे जत ? कोठे आहे जत भाग ? महाराष्ट्रात असूनही कानडी लोक का आढळतात इथे ? पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मागासलेपणाचे दु:ख का आलेय जतच्या नशिबी ? पावसाचे प्रमाण किती आणि कसे आहे ? इथे पडणारया पावसाच्या पाण्याचा थेंब कोठे जातोय ? पाणी नाही हे इतकेच कारण आहे ? का आणखी काही ? काय करतेय महाराष्ट्र शासन ? जत तालुक्याची इत्यंभूत माहिती पहा फक्त http://jalyuktjat.blogspot.in/ या ब्लॉग वर

Friday, 24 May 2013

दुष्काळ निवारणाचा ' महाराष्ट्र पॅटर्न '


गंगा येणार दुष्काळी अंगणी (दुष्काळ निवारणाचा ' महाराष्ट्र पॅटर्न ')



                                           महाराष्ट्राचे  कृषी आयुक्त उमाकांत दांगट


               दुष्काळी भागात सव्वाचार कोटी घनमीटर पाणी साठणार : उमाकांत दांगट यांचा दावा
 


  दुष्काळात पाणीटंचाईचा सामना कराव्या लागलेल्या गावांमध्ये पुन्हा ही परिस्थिती उद् भवू नये , म्हणून उभ्या राहिलेल्या दीड हजार सिमेंट बंधाऱ्यांच्या साखळीत येत्या पावसाळ्यामध्ये तब्बल सव्वाचार कोटी घनमीटर अधिक पाणी साठणार आहे . यातून दुष्काळ निवारणाचा ' महाराष्ट्र पॅटर्न ' तयार झाला असून , आणखी पंधरा जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे .

यंदा महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाणीटंचाईने नागरिकांचे प्रचंड हाल झाले . अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याने , राज्यात सध्या पाच हजार टँकर्स सुरू आहेत . अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे ही परिस्थिती असून , त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचे आढळून आले आहे . त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी राज्य सरकारच्या कृषी आणि लघुपाटबंधारे विभागांच्या वतीने सिमेंटच्या साखळी बंधाऱ्यांची योजना हाती घेण्यात आली . सहा जिल्ह्यांमध्ये या योजनेतून एक हजार ४२२ बंधारे उभे राहिले असून , येत्या एक जून या एकाच दिवशी सर्व बंधाऱ्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे , अशी माहिती कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी दिली . या बंधाऱ्याची सरासरी पाणी साठविण्याची क्षमता दहा हजार घनमीटर इतकी असून त्यामध्ये दोन वेळा भूगर्भात पाणी साठते आणि त्यानंतर दहा हजार घनमीटर जागेवर उपलब्ध होते . त्यामुळे एका बंधाऱ्यात तीस हजार घनमीटर इतके पाणी साठणार आहे .

दरम्यान , गेल्या काही काळात पाण्याचा बेसुमार उपसा झाल्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी कमी झाली आहे . या बंधाऱ्यांमुळे भूगर्भातील पाणीसाठा वाढल्यामुळे अर्धा किलोमीटर अंतरावरील विहिरीही रिचार्ज होत असून , एका बंधाऱ्यातून चार ते पाच हेक्टर क्षेत्रास संरक्षित पाणी मिळेल , अशी माहिती राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमाचे कृषी उपसंचालक जी . आर . आढाव यांनी दिली . पावसाळा संपल्यानंतर या बंधाऱ्यांमधून चार ते पाच महिने , म्हणजे फेब्रुवारीपर्यंत पाणी उपलब्ध होणार आहे . यापैकी अनेक गावांमध्ये वर्षभर पाणी मिळणार आहे .

१५ जिल्ह्यात विस्तार

यंदा या योजनेला चांगले यश लाभल्यामुळे राज्य सरकारने आणखी पंधरा जिल्ह्यांमध्ये याचा विस्तार केला आहे . मार्चमध्ये टँकर सुरू असलेल्या ७२ तालुक्यांमधील गावांमध्ये ही कामे सुरू होत असून सरकारने यासाठी १८७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे .

राज्यभरातील बंधारे

पुणे - ८०

सातारा - १९९

अहमदनगर - २०२

सांगली - ६४८

सोलापूर - ८८

उस्मानाबाद - ४

No comments:

Post a Comment