जत तालुक्याची इत्यंभूत माहिती

काय आहे जत ? कोठे आहे जत भाग ? महाराष्ट्रात असूनही कानडी लोक का आढळतात इथे ? पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मागासलेपणाचे दु:ख का आलेय जतच्या नशिबी ? पावसाचे प्रमाण किती आणि कसे आहे ? इथे पडणारया पावसाच्या पाण्याचा थेंब कोठे जातोय ? पाणी नाही हे इतकेच कारण आहे ? का आणखी काही ? काय करतेय महाराष्ट्र शासन ? जत तालुक्याची इत्यंभूत माहिती पहा फक्त http://jalyuktjat.blogspot.in/ या ब्लॉग वर

Sunday, 19 May 2013

महात्मा फुले जल व भूमी अभियान 2012-13 (महाराष्ट्र शासन )

महाराष्ट्रात गेल्या 100 वर्षांपेक्षा जास्त वर्षातला सर्वात मोठा दुष्काळ 2012-13 या वर्षात पडला आहे. सगळे तलाव , ओढे , नाले  आटले आहेत. जुने लोक आणि जाणकार सांगतात 1972 पेक्षा हि मोठा आणि भीषण हा या वर्षीचा दुष्काळ आहे. आतापर्यंत अनेक आपत्ती झेलणारया या राष्ट्राला हे संकट नवीन नव्हते. परंतू संकटाला हि संधी मानून आपले राज्य सरकार लोक सहभागातून एक अभूतपूर्व काम करीत आहेत.
शासनाच्या कुठच्याही इतर पाणी योजनांपेक्षा " आपले गाव , आपला पाऊस - आपली भूमी आपले पाणी " या उक्तीनुसार महाराष्ट्रात जल युक्त गाव अभियान पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या संकल्पनेतून सुरु झाले. राज्य किंवा केंद्र शासन एखाद्या ठिकाणाचा दुष्काळ हटवण्यासाठी दुसरीकडून किंवा जास्त पाऊस पडणारया भागाकडून दुसऱ्या खास करून दुष्काळी भागाकडे पाणी उचलून (LIFT IRRIGITION) आणण्याच्या योजना राबवीत आहे. परंतू आज पहायला गेले तर मनगटशाही अथवा प्रबळ राजकीय ताकद ज्या भागात आहे त्या भागाकडेच या योजना जास्ती प्रमाणात आखल्या आणि राबवल्या जातात हे वास्तव चित्र आहे. या योजनांची एकूण व्याप्ती, अवाढव्यता आणि एकूण खर्च लक्षात घेता त्यांच्या व्यवहार्यतेवरच प्रश्न चिन्ह लागले आहे. परिणामी ज्या लोकांसाठी या योजना आखल्या आणि सुरु केल्या ते लोक आजही पाण्यासाठी तडफडत आहेत.
या सर्व कुठच्याही इतर पाणी योजनांपेक्षा आपल्या भागात, आपल्या गावात पडणारा आपला पाऊस, ज्यावर केवळ आपलीच मालकी आहे असा हक्काचा पाऊस आणि त्याचे हक्काचे पाणी जास्तीत जास्त अडवले, जिरवले तर…. आपलाच दुष्काळ नाहीसा होईल…. नव्हे - नव्हे  कायमचा नष्ट होईल या साध्या आणि  सरळ विचाराने महात्मा फुले जल व भूमी अभियान हि योजना…हे अभियान सुरु झालेय.
महात्मा फुले जल व भूमी अभियान 2012-13 (महाराष्ट्र शासन )

 

No comments:

Post a Comment