जत तालुक्याची इत्यंभूत माहिती

काय आहे जत ? कोठे आहे जत भाग ? महाराष्ट्रात असूनही कानडी लोक का आढळतात इथे ? पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मागासलेपणाचे दु:ख का आलेय जतच्या नशिबी ? पावसाचे प्रमाण किती आणि कसे आहे ? इथे पडणारया पावसाच्या पाण्याचा थेंब कोठे जातोय ? पाणी नाही हे इतकेच कारण आहे ? का आणखी काही ? काय करतेय महाराष्ट्र शासन ? जत तालुक्याची इत्यंभूत माहिती पहा फक्त http://jalyuktjat.blogspot.in/ या ब्लॉग वर

Sunday, 19 May 2013

आतापर्यंत बंधारे , तलावातून काढला 4 दश लक्ष घन मीटर गाळ

जत महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एक ऐतिहासिक तालुका. माणदेशी प्रांतातील इतर प्रांतांप्रमाणेच दुष्काळग्रस्त म्हणून ज्याची सर्वत्र ओळख.सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून ज्याचा परिचय करून दिला जातो. त्या जत तालुक्याचे  हवामान उन्हाळ्यात सरासरी 25 ते 40 अंश इतके असते कधी कधी ते 42 - 44 ला हि जावून भिडते तर हिवाळ्यातले हवामान 20 ते 27 अंश इतके असते. इथले सरासरी पाऊसमान 450 ते 500 मिली मीटर आहे. दुष्काळ जणू या तालुक्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे. या दुष्काळावर मात करण्यासाठी तालुक्यातील जनता राज्य शासनाच्या हातात हात घालून काम करीत आहे.

No comments:

Post a Comment