जत तालुक्याची इत्यंभूत माहिती

काय आहे जत ? कोठे आहे जत भाग ? महाराष्ट्रात असूनही कानडी लोक का आढळतात इथे ? पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मागासलेपणाचे दु:ख का आलेय जतच्या नशिबी ? पावसाचे प्रमाण किती आणि कसे आहे ? इथे पडणारया पावसाच्या पाण्याचा थेंब कोठे जातोय ? पाणी नाही हे इतकेच कारण आहे ? का आणखी काही ? काय करतेय महाराष्ट्र शासन ? जत तालुक्याची इत्यंभूत माहिती पहा फक्त http://jalyuktjat.blogspot.in/ या ब्लॉग वर

Sunday, 29 September 2013

कर्नाटकनं पाळला ‘पाणी’धर्म, दुष्काळग्रस्त `जत`ला दिलासा!


कर्नाटकनं पाळला ‘पाणी’धर्म, दुष्काळग्रस्त `जत`ला दिलासा!
कर्नाटकनं पाळला ‘पाणी’धर्म, दुष्काळग्रस्त `जत`ला दिलासा!
जत (जि . सांगली, महाराष्ट्र ) = सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. या परिसराला कर्नाटकचं पाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि वनमंत्री पतंगराव यांच्या प्रयत्नांना यश आलंय.

सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त `जत` मधील ४२ गावानां कर्नाटकातील तुर्ची-बबलेश्वर जलसिंचन योजनेचं पाणी देण्यात येईल अशी, घोषणा कर्नाटकाचे जलसंपदा मंत्री एम. बी. पाटील यांनी केली. गुड्डापूर इथल्या पाणी परिषदेत पाटील बोलत होते.

या पाणीपरिषदेस महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील मंत्री उपस्थित होते. दुष्काळग्रस्त जतला कर्नाटकमधून पाणी मिळण्यासाठी अनेक वर्षापासून लोक लढा देत आहेत. वर्षानुवर्ष जतमधील लोक दुष्काळाचा सामना करत आहेत. `जत` मधील ४२ गावानां कर्नाटकातील पाणी देण्यासाठी योजनेचं काम जानेवारी महिन्यापासून सुरु करण्यात येणार आहे. अशी माहिती कर्नाटकाचे जलसंपदा मंत्री एम. बी. पाटील यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment