जत तालुक्याची इत्यंभूत माहिती

काय आहे जत ? कोठे आहे जत भाग ? महाराष्ट्रात असूनही कानडी लोक का आढळतात इथे ? पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मागासलेपणाचे दु:ख का आलेय जतच्या नशिबी ? पावसाचे प्रमाण किती आणि कसे आहे ? इथे पडणारया पावसाच्या पाण्याचा थेंब कोठे जातोय ? पाणी नाही हे इतकेच कारण आहे ? का आणखी काही ? काय करतेय महाराष्ट्र शासन ? जत तालुक्याची इत्यंभूत माहिती पहा फक्त http://jalyuktjat.blogspot.in/ या ब्लॉग वर

Sunday, 23 February 2020

दुष्काळी जत तालुक्याची वैशिष्ट्ये

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी  जत तालुक्याची वैशिष्ट्ये ऐकून थक्क व्हाल...


जत तालुक्याला रामायण महाभारत काळापासून संदर्भ आहेत.
1) भीमाने वध केलेल्या बंकासूराचे जतमध्ये प्राचीन मंदिर आहे.  बंकेश्वर नावाचे जगातील हे एकमेव मंदीर आहे.
2) काळवेदन राक्षसाचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाने मुचकंदेश्वर ॠषींच्या आश्रमात आश्रय घेतला होता.  ते मुनीवर जत तालुक्यातील मुचंडी येथे वास्तवास होते. त्यांच्या नावावरून गावाचे नाव मुचंडी पडले आहे.
3) महर्षी वाल्मिकी यांनी ध्यान साधना केलेली गुफा कोळगिरी डोंगरात आहे.  त्याला जोगीहरी म्हणून ओळखले जाते.  वाल्या कोळी यांचे वास्तव्य होते म्हणून गावाचे नाव कोळगिरी पडले आहे.
4) श्री दत्त महाराज यांनी होम केलेल्या कुंडापैकी तिसरा कुंड जत तालुक्यातील तिकुंडी येथे आहे.  त्यामुळे गावाचे नाव तिकुंडी पडले आहे.
5) महात्मा बसवेश्वर यांच्या शरण दलाच्या सेनापती,  हजार वर्षापूर्वी सामुहिक विवाह पध्दती सुरू करणाऱ्या देवी दानम्मा यांचा जन्म जत तालुक्यात उमराणी येथे  झाला. गुड्डापूर हे त्यांचे सासर.  सध्या ते लिंगायत धर्माचे तिर्थक्षेत्र आहे.
6) हिंचगीरी सांप्रदायाचे संस्थापक भाऊसाहेब महाराज जत तालुक्यातील उमदीचे.
7) संत गाडगे बाबा महाराज यांचे शिष्य सद्गुरू बागडे बाबा जत तालुक्यातील गोंधळेवाडीचे
8) छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती प्रतापराव गुजर व आदीलशाही सेनापती अब्दुल करिम बहलोल खान यांच्यातील जगप्रसिद्ध युध्द जत तालुक्यातील  उमराणी येथे झाले.
9) कर्नाटक व महाराष्ट्र सीमावर्ती भागातील राॅबीनहूड,  क्रांतीसूर्य सिंदूर लक्ष्मण जत तालुक्यातील सिंदूरचे .
10) सांगली-सोलापूर-विजापूर अशा तीन जिल्ह्यातील पाच परगण्यात 350 वर्षे राज्य करणारे डफळे संस्थान जतचेच.
11) स्वतंत्र सांगली जिल्ह्याचे पहिले खासदार जतचे श्रीमंत विजयसिंह राजे  हे होते.
12) श्रीमंत विजयसिंह राजे हे महाराष्ट्र रणजी संघाचे कर्णधार होते. गोलमेज परिषदेस उपस्थित राहणारे ते जिल्ह्यातील एकमेव होते.
13) जिल्ह्यातील पहिले विमान व विमानतळ जतला होते.
14) जत तालुक्यात 4 भुईकोट किल्ले व एक डोंगरी दूर्ग, तसेच विसहून अधिक गढ्या आहेत.
15)  जत तालुक्यात एक हजार वर्षापूर्वीचे पंधराहून अधिक शिलालेख आहेत.
16) जत तालुक्यात दोन हजार वर्षापूर्वीची 17 हेमाडपंथी मंदीरे आहेत.
17) जतच्या यल्लमादेवीची यात्रा जगप्रसिद्ध आहे.
18) माजी राष्ट्रपती बी. डी .जत्ती हे मूळचे जत तालुक्यातील.  त्यामुळे त्यांचे आडनाव जत्ती पडले.
19) जत हा गवताळ प्रदेश असून हरिण,  तरस,  लांडगे,  खवले मांजर, वोंबाट, दुर्मिळ घुबड,   म्हांडूळ, घोणस, नागसाप, अजगर  असे अनेक दुर्मिळ वन्यजीव जत तालुक्यात आजही आढळून येतात.
माडग्याळी मेंढी, बोरे,  व्हसपेठचे जेन,  वाळेखिंडी,  सिंदूर पेढे, हळद, डाळींब ही जतची खासियत आहे.

आणखही खूप वैशिष्ट्ये आहेत.
त्यासाठी वाचा " वैभवशाली जत " हे पुस्तक.
लेखक: श्री दिनराज वाघमारे,  अध्यक्ष,  जत तालुका मराठी पत्रकार परिषद
🙏

Monday, 29 August 2016

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): डॉ . राजेंद्र सिंह राणा, एक माणूस बोगस

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): डॉ . राजेंद्र सिंह राणा, एक माणूस बोगस:    डॉ . राजेंद्र सिंह राणा, एक माणूस बोगस  डॉ . राजेंद्र सिंह राणा हा माणूस आंतर राष्ट्रीय जल तज्ञ , पाणी वाला बाबा किंवा नदी पुन...

Saturday, 3 October 2015

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अग्रणी नदी पात्राचीच सुलतान गादे ते करंजे या दरम्य...

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अग्रणी नदी पात्राचीच सुलतान गादे ते करंजे या दरम्य...: अग्रणी नदी पात्राचीच   सुलतान गादे ते करंजे या दरम्यान अक्षरश : वाट लागली आहे …  या भागात नदीच्या पूर्वेकडच्या काठावर असलेल्या विठोबा मद...

Sunday, 23 February 2014

एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी, "बारमाही माणगंगा " हा केवळ एक ब्लॉग किंवा साहित्यिक लेख अगर बातम्यांचं दालन नाही, हे एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी, या भागातून जाणारया माणगंगा, अग्रणी आणि येरळा या तीन नद्यांचं भवितव्य यात सामावलं आहे. बारमाही माणगंगा हि एक मोहीम आहे, नद्या जिवंत आणि बारमाही वाहत्या करण्यासाठी चालवलेली. यात कोणा एकट्या दुकट्याची मते नाहीत तर अनेक ज्ञात- अज्ञात जाणकार तसेच रूढ अर्थाने अज्ञानी सुद्धा माणसांनी माणदेशातील नद्यांच्या पुनरुज्जीवना संदर्भात केलेला अभ्यास, मांडलेली मते, केलेले प्रयत्न आणि झालेले काम यांचा समावेश आहे. आपणही या चळवळीचा हिस्सा व्हा. प्रत्येक माणदेशी माणसाने आणि पाणी, पर्यावरण क्षेत्रात काम करणारयाने आवर्जून या व्यासपीठाचा वापर करावा. आपला, पत्रकार विजय लाळे, फेसबुक संपर्क - https://www.facebook.com/vijay.lale.5 मोबाईलवर - 8805008957. किंवा व्हाटस अप वर 7387296578. Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी,

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी,: "बारमाही माणगंगा " हा केवळ एक ब्लॉग किंवा साहित्यिक लेख अगर बातम्यांचं दालन नाही, हे एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसा...

एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी,


"बारमाही माणगंगा " हा केवळ एक ब्लॉग किंवा साहित्यिक लेख अगर बातम्यांचं दालन नाही,
हे एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी, या भागातून जाणारया माणगंगा, अग्रणी आणि येरळा या तीन
नद्यांचं भवितव्य यात सामावलं आहे. बारमाही माणगंगा हि एक मोहीम आहे, नद्या जिवंत आणि बारमाही वाहत्या करण्यासाठी चालवलेली.
यात कोणा एकट्या दुकट्याची मते नाहीत तर अनेक ज्ञात- अज्ञात जाणकार तसेच रूढ अर्थाने अज्ञानी सुद्धा माणसांनी
माणदेशातील
नद्यांच्या पुनरुज्जीवना संदर्भात केलेला अभ्यास, मांडलेली मते, केलेले
प्रयत्न आणि झालेले काम यांचा समावेश आहे. आपणही या चळवळीचा हिस्सा व्हा.
प्रत्येक माणदेशी माणसाने आणि पाणी, पर्यावरण क्षेत्रात काम करणारयाने
आवर्जून या व्यासपीठाचा वापर करावा.
आपला,
पत्रकार विजय लाळे,
 फेसबुक संपर्क - https://www.facebook.com/vijay.lale.5
मोबाईलवर - 8805008957. किंवा व्हाटस अप वर 7387296578.

Monday, 11 November 2013

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): हिमालयाच्या कुशीत वसलेल्या लडाखमध्येही दुष्काळ का ...

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): हिमालयाच्या कुशीत वसलेल्या लडाखमध्येही दुष्काळ का ...: आम्ही आहोत भगीरथाचे वारस = देशातला हा आणखी एका भगीरथाच्या वारसदाराची हि कहाणी … पहा आणि विचार करा… आपणही असे करू शकतो.… फक्त इच्छाशक्ती...